CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली-कल्याण परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शन व प्लाझमा तुटवडा

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

डोंबिवली-कल्याण परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शन व प्लाझमा तुटवडा
डोंबिवली-कल्याण परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शन व प्लाझमा तुटवडा

डोंबिवली:(बापू वैद्य): कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढीचा ओघ वाढत असून कोविड सेंटर कमी पडत आहेत. काल म्हणजे ७एप्रिला रूग्णांची संख्या जवळपास दोन हजारपर्यत पोहचली.लसीकरणही मोठ्या प्रमाणात होत असेले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी न होता वाढत आहे.

त्यात कोरोना ग्रस्त रुग्णांना लागणारे इंजेक्शन यांचा भंयकर तुटवडा निर्माण झाला असून ती खरेदीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. तसेच याचा काळाबाजार ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे, त्यामुळे नातेवाईक मिळतील त्या किंमतीत ती खरेदी करत आहेत कारण रुग्ण बरा झाला पाहिजे ही नातेवाईकांना वाटते.तसेच

काही ज्येष्ठांना प्लाझमा ची गरज आहे त्याकरिता ही वणवण फिरावे लागत आहे. अनेक रक्तपेढ्यात प्लाझमा मिळत नाही तर काही चारपाच रक्त डोनर द्या मग मिळेल असे सांगितले जाते. डोनर दिल्यानंतर ही रुग्णांना त्यांच्या रक्त गटाला मँचिंग होणार प्लाझमा मिळेपर्यंत बराच वेळ लागत आहे. प्लाझमा ची एका युनिट ची किंमत पाच ते सहा हजार युनिट व रक्त गटाशी मँचिंग साठी सुमारे तीन हजार वेगळे द्यावे लागतात. म्हणजे ऐका युनिट साठी आठ हजाराच्या आसपास किंमत होते.गरीब रुग्ण एवढे पैसे आणणार कुठून हा रुग्णांच्या नातेवाईक यांना प्रश्न पडत आहे.वरील इंजेक्शन व प्लाझमा शासनाने योग्य किंमतीत मिळण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत अशी रुग्णांच्या नातेवाईक यांची मागणी करीत आहेत.