CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क): मध्यप्रदेशातील परिया राम मनोहर लोहिया वार्ड,होशांगाबाद मध्यप्रदेश येथील मूळ राहणारा व अटाळी रोड अंबिवली स्टेशन जवळ वास्त्याव्यास असणारा सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन वय ३१ वर्ष याच्यावर दि.०९/१०/२०२१ रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गु.र.न.I १०८/२०१५ भा.द.वि.कलम ३९४,३४ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१),(II)३(२),३(४) प्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद झालेला होता. तो गेल्या सहा वर्षापासून फरार होता व पोलीसांना सापडत नव्हता.त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात मालमत्ता व शारीरिक विरोधाचे गुन्हे दाखल होते.
ठाणे क्राइम ब्रांच युनिट-3 कल्याण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांची नजर सदर गुन्ह्यावर पडली असता त्यांनी सलमानची शोध मोहीम सुरू केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी तात्काळ आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन सलमानच्या मुसक्या आवळण्यात संदर्भात मार्गदर्शन करून महत्वपूर्ण सूचनाकेल्या व आपल्या खबऱ्यांना कामाला लावले. पोलीस हवालदार कामत यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली की सलमान उर्फ जॅकी पपली इराणी हा खडवली परिसरामध्ये त्याच्या मित्राला भेटण्यासाठी शंभर टक्के येणार आहे सदर बाब कामत यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना याची हि माहिती दिली असता घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी खडवली याठिकाणी सापळा रचण्याचे आदेश दिले.
काल हा सापळा स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी रचला त्यांनी सर्वांना विविध ठिकाणी उभे करून ते मोक्याच्या ठिकाणी थांबले. सलमान जसा आला तसा त्याला ओळखणाऱ्याने ईशारा केला . सलमानला याची कुणकुण लागली कि पोलीस आपल्या मागावर आहेत त्याने तेथून पळ काढला परंतु पोलीस त्याच्या मागावर अगोदरच होते त्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला आणि त्याच्या मुसक्या खडवली परिसरातून आवळल्या त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल मिळून आला त्याला तात्काळ क्राईम ब्रँच युनिट ३, कल्याण येथे आणण्यात आले व त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली असता तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीसांना समजले त्याच्यावर एकूण ११ गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत.ते पुढीलप्रमाणे
१) एम् एफ सी पो.स्टे.I ५२/२०१५ भादवि कलम ३९४,३४ प्रमाणे ,२) एम् एफ सी पो.स्टे.I ९०/२०१२ भादवि कलम ३९४,३४ प्रमाणे ,३)एम् एफ सी पो.स्टे.I २३४/२०१२ भादवि कलम ३९४,३४4,४) एम् एफ सी पो.स्टे.I २८७/२०१२ भादवि कलम ३९४,३४ प्रमाणे ,५)आर.के.मार्ग पो.स्टे. I ३२/२०१४ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे ,६)आर.के.मार्ग पो.स्टे. I ४१/२०१४ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे ,७)आर.के.मार्ग पो.स्टे. I ४४/२०१४ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे ,८)आर.के.मार्ग पो.स्टे. I ५१ /२०१४ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे ,९) आर.के.मार्ग पो.स्टे. I ०६/२०१४ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे ,१०)मानपाडा पो.स्टे. I२८६/२०१० भादवि कलम ३९४,३४प्रमाणे ,११)ताडदेव पो.स्टे. I ०६/२०१४ भादवि कलम ३९२,३४ या प्रमाणे त्याच्यावर गुन्ह्ये नोंद आहेत.
जॅकीला मुद्देमाल व पुढील तपास कामी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे रिपोर्ट सह पुढील तपासासाठी जमा करण्यात आले असून त्याच्यावर कोणते गुन्हे पाहिजेत अगर कसे व विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.
सदर कामगिरीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर,पोलीस हवालदार कामत ,मंगेश शिर्के, सचिन साळवी, सुरेश निकुळे ,राहुल यांनी केली आहे.