CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

(डीएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील28 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

CRIME BORDER | 26 December | 01:48 PM

CRIME BORDER NEWS NETWORK

ठाणे दि.23 : प्राथमिक शिक्षण पदविका (डीएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील शासकीय कोट्यातील रिक्त जागांसाठी विशेष फेरी घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी 28 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका (D.EL.Ed.) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबत सविस्तर सूचना प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

प्रवेशासाठी पात्रता-प्रवेशाची शैक्षणिक पात्रता - इयत्ता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5% व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5% गुणांसह) प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दि. 24 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2021 असा आहे. दि. 24 सप्टेंबर ते दि. 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत पडताळणी अधिकारी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणार आहेत. प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे)- खुला संवर्ग रुपये 200/- खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये 100/- इतकी आहे.

 

यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून मान्य (ॲप्रुव्ह) करून घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन मान्य केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वतः निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल / लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरी नंतर (D.El.Ed ) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने कळविले आहे.