CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Sister raped by brother विदर्भ : सख्खा भावाने बहिणीलाच गर्भवती केले भाऊ -बहिणीच्या नात्याला काळीमा! - रक्षा बंधनाच्या पवित्र सणा आगोदर खळबळजनक घटना

CRIME BORDER | 18 December 2025 | 01:45 PM

Sister raped by brother विदर्भ : सख्खा भावाने बहिणीलाच गर्भवती केले भाऊ -बहिणीच्या नात्याला काळीमा! - रक्षा बंधनाच्या पवित्र सणा आगोदर खळबळजनक घटना
Vidarbha Crime New : वर्धा : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. (Sister raped by brother) सख्ख्या भावानेच आपल्या १५ वर्षीय लहान बहिणी सोबत आई-वडील कामानिमित्त बाहेर गेलेले असताना बळजबरीने अनैतिक शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि ती गरोदर राहिली. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणातील आरोपीही अल्पवयीन १७ वर्षीय आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर मानलं जातंय. सख्ख्या भावाने बहिणीसोबत हैवानीकृत्य केल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेलेले असताना गैरकृत्य केलं. पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर या भयंकर प्रकाराचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Wardha Rape News) अल्पवयीन आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जातो आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलीस कसून चौकशी करत आहेत. वर्धा शहरातूनच भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली आहे. विकृतीचा महाकळस गेल्या काही वर्षा पासून समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत घटना घडताना बघायला मिळत आहे . मोबाइल आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा परिणाम तरुण पिढीच्या मनावर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. अशातच वर्ध्यातून काळीज हेलावून टाकणारी सख्ख्या भावानेच बहिणीचे शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . आई-मुलगा, बहिण-भाऊ, बाप-लेक या नात्यांना काळीमा फासणाऱ्या विचित्र घटना गेल्या काही दिवसांत सातत्यानं समोर आल्या आहेत. त्यात वर्ध्यातील या घटनेनं भर टाकलीये. पोट दुखत असल्याने कळलं पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तिचे पालक तिला घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेली हकीकत ऐकून पालकांना धक्काच बसला. पीडिता ६ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने तिच्या आई वडिलांना मोठा धक्काच बसला. आई-मुलगा, बहिण-भाऊ, बाप-लेक,दीर भावजय अशा नात्यांना काळीमा फासणाऱ्या विचित्र घटना गेल्या काही दिवसांत सातत्यानं समोर आल्या आहेत. त्यात वर्ध्यातील या घटनेनं भर टाकलीये. घृणास्पद सख्या भावाने सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची लाजीरवाणी घटना नुकतीच उघडकीस आली आहे . १५ वर्षीय पीडित मुलगी घरी होती. तिचे आई वडिल बाहेर कामानिमित्त गेले होते. याची संधी साधून नराधम १७ वर्षीय सख्या भावाने बहिनीचं शारीरीक शोषण केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला घरच्यांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात तिला नेलं. त्यावेळी ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर घरच्यांनी पोली सांत याबाबतची तक्रार दिली. वर्धा शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने या घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. पीडित मुलगी ६ महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट पोलीसांना याची माहिती दिली होती. पोलीसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने सुरुवातील काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करीत होती.कारण अत्याचार करणारा दुसरा तिसरा कुणी नसून तिचा सख्खा भाऊ असल्याने ती सांगत नव्हती . त्यामुळे हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपवण्यात आले. सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी मुलीचे समुपदेशन केले. तिला धीर देत विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार पाणावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेची साक्ष नोंदविल्यानंतर शहर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. सख्ख्या बहिणीचे शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकरणात शहर पोलीसांनी उघडकीस आणला. त्यानंतर ही विकृत केलेल्या १७ वर्षीय भावाला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याचीही साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती शहर पोलीसांनी दिली असून पुढील कारवाई केली जातेय. संदर्भ tv9marathi