CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात विलगीकरणातील पोलीसांची संख्या ५१ वर पोहचली आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या या सर्व २२ पोलीस कर्मचाऱ्यांची मंगळवारी कॅडबरी उड्डाण पूलाखाली असलेल्या केंद्रामध्ये कोरोनाची तपासणी करण्यात आली. या सर्वांनाच आता विलगीकरणात ठेवले आहे. त्यापूर्वी, मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३२ पोलीस कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिघांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. त्यांना विलगीकरण कक्षातून थेट रुग्णालयात पाठविण्यात आले आहे . त्यामुळे वर्तकनगरचे २२ आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे २९ अशा ५१ पोलीसांवर विलगीकरणात राहण्याची वेळ ओढवली आहे.
यातील काहींना घरात तर काहींना विलगीकरण केंद्रामध्येच विलग रहावे लागणार आहे. त्यामुळे नाक्यावरील बंदोबस्ताच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी करायची असाही प्रश्न आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जनतेने पोलीसांना सहकार्य करण्याची गरज असून पोलीसही माणूस आहे हे विसरू नये . त्यांनाही घरदार आहे कुटुंब आहे . जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस , डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहे . हि वेळ निघून जाईल पण आठवणी मात्र कायम राहतील .हे सर्वांनी ध्यानात घावे . (सौजन्य प्रजासत्ताक जनता )