CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
ठाणे : प्रत्येक वर्षी महाराष्ट्र शासनाकडून माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या कल्याणाकरीता सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे ठराविक उद्दीष्ट प्रत्येक जिल्हयासाठी दिले जाते.संबंधित जिल्हाधिकारी महोदय त्यांच्या अखत्यारीतील शासकीय कार्यालयांना उद्दीष्ट ठरवून देत असतात.वर्ष २०२० करीता जिल्हाधिकारी,ठाणे यांनी ठरवून दिलेल्या कार्यालयांपैकी आयुक्त,ठाणे महानगरपालिका यांनी रुपये ११.९० लाख व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद ठाणे यांनी स्वत: दखल घेवून दिलेल्या अवधीच्या ५ महिने अगोदरच रुपये १०.१५ लाख उद्दीष्ट पूर्ण केले आहे.
शासकीय कार्यालयांनी त्यांना देण्यात आलेल सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे.असे आवाहन ठाणे/पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.