CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
टिटवाळा (क्राईम बॉर्डर टीम) : श्री स्वामी सखा (मासिकाच्या) संपादिका व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवलीच्या विश्वस्त तसेच क्राईम बॉर्डरच्या वृत्त संपादिका सौ सीमाताई राजेंद्र वखरे यांच्या दि.२८ जुलै २०२१ रोजी वाढदिवसानिमित्त टिटवाळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रामुख्याने वृक्षारोपण अभियान व कवी संमेलन तसेच गायन स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या.
निसर्गाचा समतोल राहावा यासाठी वृक्षारोपण केल्या गेले. नवोदित कवींसाठी संमेलन तसेच गायन वृद्धि वाढावी यासाठी गायन स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या .या कार्यक्रमाला कविवर्य व सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे भिवंडी , शिवभक्त ईश्वर राया समाधान कोर आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल क्राईम बॉर्डर चे संपादक तथा क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी त्यांचे आभार मानले.
सदर स्तुत्य उपक्रम हा पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत शाखा कल्याण अध्यक्ष एन.ए. कदम यांनी राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे यांनी सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविले व सौ.सीमाताई वखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.