CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सारथी.... असून अडचण नसून खोळंबा - ओबीसी नेत्यांना मराठयांचा एवढा सोस का?

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

सारथी.... असून अडचण नसून खोळंबा - ओबीसी नेत्यांना मराठयांचा एवढा सोस का?

ठाणे : गेली दोन दिवस सारथी या संस्थेेवरून चाललेला संशयाचा आजार भंयंकर आहे. तर नामदार वडेट्टीवारांनी मराठा राग आळवत केलेल्या इशार्‍यांचा खटाटोपही समजण्या पलिकडचा आहे. मात्र ज्या सारथी संस्थेवरून हा गोंधळ सुरू आहे. ती संस्थाच मुळात असून अडचण नसून खोळंबा अशी असून अनेक ओबीसी नेत्यांचा मराठा द्वेष याही आधी लपलेला नाही.

 

कोट्यवधी मराठा समाजानं रस्त्यावर उतरून मिळवलेलं हे आरक्षण कोर्टाच्या फायलीतच संपविण्याचे खटाटोप सुरू आहेत. आरक्षण देतानाच मागील सरकारनं इतर १६ सुविधांचं वचन मराठा समाजाला दिलं होतं. मात्र ही सारी वचनं सारथीमध्ये आणि सारथी फायलीतच राहिली आहे. सारथी ही संस्था मी वाढविण्याचा प्रयत्न करतो आहे. असा गळा काढणार्‍या ना. वडेट्टीवार आणि त्यांच्या सरकारनं सरकारमध्ये आल्यानंतरच्या सात महिन्यांत सारथी वाढावी म्हणून किती कागद हलवले हे सांगावं, असं आवाहन सकल मराठा समाज / मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, ज्येष्ठ पत्रकार कैलाश म्हापदी यांनी केले आहे.

 

रस्त्यावरती लढून मिळविलेल्या आरक्षणाविरोधात खरंतर कुणाच्या पोटात दुखण्याचं काम नाही. यापूर्वीदेखील भुजबळ, पिचड यांच्यापासून अनेकांचे मराठा द्वेष पाहण्यात आलेत. यापूर्वी स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत एस.एन. टी. ओबीसी अशा अनेक समाज घटकांना आरक्षणं मिळाली. या आरक्षणाचं मराठा समाजानं नेहमी स्वागत केलं. असं असतांना मराठा अरक्षणाविषयी हा पोटशुळ कशासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच सारथी ही संस्था मागच्या दरवाजाने बंद करण्याचा प्रयत्न झाला. तर मात्र कोरोनाची भीती झुगारून मराठ्यांना पुन्हा एकदा रस्त्यावरती यावं लागेल. कारण मराठ्यांच्या भविष्याला होत असलेला हा राजकीय संसर्ग कोरोनापेक्षाही महाभयंकर आहे. असे मत कैलास म्हापदी यांनी प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केले आहे.