CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
बेटावद बु।। (क्राईम बॉर्डर, रिपोर्टर):नुकत्याच पार पडलेल्या ग्रा पं निवडणुकीत बेटावद बु।। ता जामनेर येथील ग्रा पं सरपंच पदी युवाशक्ती पॅनल च्या मनीषा कृष्णा पाटिल (नामाप्र महिला) तर उपसरपंच पदी गोपाल सुधाकर कदम यांची बहुमताने निवड करण्यात आली. ९ पैकी ५ सदस्यांनी समर्थनार्थ तर ४ सदस्यांनी विरोधात मतदान केले. स्पष्ट बहूमत असल्यामुळे दोन्ही उमेदवार विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. ओ. दिनेश पाटील यांनी काम पाहिले.गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. निकाल लागेपर्यंत दोन्ही गटांकडून सरपंच पदावर दावा ठोकला जात होता.तसेच नागरिकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली होती.
सरपंच पदी निवडून आलेल्या मनीषा पाटील ह्या सामान्य शेतकरी कुटुंबातील असुन त्यांना कुठलाही राजकिय वारसा नाही.तसेच उपसरपंच पदी निवडून आलेले गोपाल कदम यांचे आजोबा व वडील ग्रा पं सदस्य राहिलेले आहेत.त्यांच्याकडे राजकारण तसेच समाजकारणाचा दांडगा अनुभव आहे.त्यांच्या अनूभवाचा गावाला नक्कीच फायदा होईल व गावाच्या विकासाला गती मिळेल अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचे नागरिकांडून अभिनंदन करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
युवाशक्ती कडून मनीषा कृष्णा पाटील ,गोपाल सुधाकर कदम ,अस्माबी लतीफशहा फकीर,कमलबाई तुळशीराम काळे,पद्माकर सिताराम सुरवाडे ,तर गावकरी पॅनल तर्फे मोहन माधव भोयटे,ज्योती गणेश शर्मा, रुपाली दिनकर ठोंबरे,अश्विनाबी इकबाल पटेल हे सदस्य गावगाडा हाकणार आहे .
गुलाबपुष्प देऊन क्राईम बॉर्डर चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे व अजय मराठे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
V