CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
नवी मुंबई, - भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालय, मुंबई (Circle Office, Mumbai) यांनी पत्र क्र. No.Estt/4-1/GDS ONLINE ENGAGEMENT/ 3 RD CYCLE/2021 द्वारे ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
तसेच सदर जाहिरातीनुसार अधिक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या (BPM) 13 हि पदे भरली जाणार आहेत.म्हणून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 26 मे, 2021 रोजी व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत म्हणून याद्वारे आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पुढील संकेत स्थळावर OLINE जाऊन भरावेत. (http://appost.in/gdsonline/) अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 मे, 2021 असून इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: (By hand) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.सदर अर्जासाठीची फी प्रधान डाकघर, पनवेल -410 206 येथे जमा करु शकता.
भारतीय डाक विभाग पैसे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फोन व संदेश पाठवीत/ करत नाही. निवड झालेल्या उमेदवारांना सिस्टिम जनरेटेड संदेश त्यांची निवड झाल्यावर प्राप्त होऊ शकेल. आवश्यक पत्र व्यवहार (गरज असल्यास ) अधिकृत भरती कार्यालयामार्फत केला जाईल याची नोंद घ्यावी म्हणून उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, आपला नोंदणीकृत क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करु नये व अशा फेक /फसव्या अफवा पासून दूर राहावे/ सावध राहावे. तसेच भारतीय डाक विभाग कोणत्याही हेतू साठी आपणास फोन करत नाही. म्हणून उमेदवारांनी याबाबतीत जागरुक राहावे व कोणत्याही अफवांना, भूलथापाना बळी पडू नये.
अधिक माहितीसाठी http://appost.in/gdsonline या संकेतस्थळास भेट द्यावी. याबाबतचे नियम व अटी वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे वरिष्ठ अधिक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग पनवेल विभाग यांनी एका परिपत्रकाव्दारे कळविले आहे.