CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
- मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं आज निधन झालं. वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यास न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. परंतु काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज ते मृत्यूझी झुंज देता देता हरले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. चित्रपट निर्माते शूजित सरकार यांनी इरफान खान यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करुन इरफान खान यांचं निधन झाल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं आहे की, "माझा प्रिय मित्र इरफा... तू लढलास. मला तुझा अभिमान आहे. आपण पुन्हा भेटू. स्तुपा आणि बाबिल यांचं सांत्वन.. तुम्ही सुद्धा लढलात. या लढाईत तू शक्य तेवढं केलंस. तुझ्या आत्म्याला शांती मिळो...इरफान खान सलाम."
उमदा कलाकार इरफान खान यांनी १६ मार्च २०१८ ला आपल्या आजाराविषयी खुलासा केला होता. "मला 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' झाल्याचे समजले. सध्या तरी कठीण झाले आहे. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींचे प्रेम आणि सामर्थ्यामुळे माझ्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे. मला उपचारांसाठी परदेशात जावे लागणार आहे. मला शुभेच्छा पाठवत राहा, अशी विनंती करतो," असं इरफान खान यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आजारावरील उपचारांसाठी ते परदेशात गेले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर दहा महिन्यांनी इरफान खान मायदेशी परतले होते. आपल्या आजारातून सावरत त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले होते. पानसिंह तोमर, पिकू, बिल्लू, तलवार, द लंच बॉक्स, मकबूल, हिंदी मीडियम यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांसह अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं होतं. अंग्रेजी मीडियम हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं
- इरफान खान उर्फ साहबजादे इरफान खान (जन्म : जयपूर, ७ जानेवारी १९६७; मृत्यू : मुंबई, २९ एप्रिल २०२०) हा एक हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांत, नाटकात तसेच दूरचित्रवाणीवर काम करणारा भारतीय अभिनेता होता. एम.ए. करत असताना त्याला दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली. नेमसेक, स्लमडॉग मिलेनियरर या इंग्रजी व पानसिंग तोमर, मकबूल या चित्रपटांतील कामामुळे प्रकाशझोतात आला. २०११ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.एनडीटीव्ही लुमियरच्या दी ऑर्फनेज चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी इरफान खान जन्म साहबजादे इरफान अली खान ७ जानेवारी, १९६७ जयपूर, राजस्थान, भारत मृत्यू २९ एप्रिल २०२० (वय: ५३) मुंबई, महाराष्ट्र, भारत राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र अभिनेता कारकीर्दीचा काळ इ.स. १९८८ - २०२० भाषा हिंदी, इंग्रजी प्रमुख चित्रपट नेमसेक, पान सिंग तोमर, मकबूल, सलाम बॉंबे प्रमुख टीव्ही कार्यक्रम डर (स्टारप्लस), चाणक्य, चंद्रकांता, भारत एक खोज पुरस्कार पद्मश्री पत्नी सुतपा सिकदर
इरफान खानचे प्रमुख हिंदी/इंग्रजी चित्रपट[संपादन] ॲसिड फॅक्टरी (इंग्रजी) एक डॉक्टर की मौत ज्युरासिक वर्ल्ड (इंग्रजी) द अमेझिंग स्पायडरमॅन (इंग्रजी) द वॉंरियर (इंग्रजी) नेमसेक (इंग्रजी) पानसिंग तोमर मकबूल रोग रोड टु लडाख (लघुपट) लाईफ ऑफ पाय (इंग्रजी) लाईफ इन मेट्रो (इंग्रजी) सच अ लॉंग जर्नी (इंग्रजी) सलाम बॉंबे स्लमडॉग मिलेनियर (इंग्रजी) हासिलइरफान खान उर्फ साहबजादे इरफान खान हा एक हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांत, नाटकात तसेच दूरचित्रवाणीवर काम करणारा भारतीय अभिनेता होता. एम.ए. करत असताना त्याला दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली. नेमसेक, स्लमडॉग मिलेनियरर या इंग्रजी व पानसिंग तोमर, मकबूल या चित्रपटांतील कामामुळे प्रकाशझोतात आला.
इरफान खान - जन्मतारीख: ७ जानेवारी, १९६७ सध्या ट्रेंडमध्ये असलेले जन्मस्थळ: जाइपूर मृत्यूची तारीख: २९ एप्रिल, २०२० मृत्यूस्थळ: कोकिलाबेन धीरुभाई अम्बानी अस्पताल और मेडिकल रिसर्च इंस्टिट्यूट, मुंबई