CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नाभिक समाज संघटना , डोंबिवली येथे हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

नाभिक समाज संघटना , डोंबिवली येथे हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क


डोंबिवली : येथे हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या ७९ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने डोंबिवली नाभिक समाज संघटनेचे श्री संत सेना महाराज सभागृह डोंबिवली (पूर्व ) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वीरभाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान वीर भाई कोतवाल यांनी केलेल्या कार्याचा आढावा समाजबांधवांना समोर मांडण्यात आला. त्याचबरोबर वीर भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नाभिक समाज संघटनेच्या वतीने प्रथमच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

 

यावेळी नाभिक बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.कोरोना नियमाचे पालन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या वेळी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत, उपाध्यक्ष रमेश वखरे ,सचिव मंगेश पोफळे, खजिनदार बाळा पवार, सहखजिनदार तुषार शिंदे, एडवोकेट लक्ष्मण काशीद , दशरथ चित्ते , आनंद पवार आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कल्पना कारुळकर ,सोनाली चव्हाण आदि उपस्थित होते.