CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
डोंबिवली : क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क :
पोलीस रेझिंग डे सप्ताह आश्रय महिला संस्था व अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला साठी सॅनिटरी पॅड ,कपडे वाटप आणि शिक्षण व व्यसन मुक्ती ,मासिक धर्माबाबत जनजागृती यावर व्याख्यान आदिवासी महिला साठी जनजागृती कार्यक्रम
दि.८ जानेवारी २०२२ वार शनिवार रोजी सायंकाळी ४.०० वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त सालाबादाप्रमाणे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन पोलीसांमार्फत केले जाते. यासाठी विविध सामाजिक संस्था यांचे सहकार्य लाभते. यावर्षी सुद्धा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ तालुक्यात आदिवासी बहुल संख्या असल्याने पहाडाच्या वस्तीत असलेल्या आदिवासी बंधू-भगिनी साठी व वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आजही महिलांमध्ये मासिक धर्मा बाबत काही गैरसमजुती आहेत ,त्या व व्यसनाधीनता तसेच शैक्षणिक जनजागृती यावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
यावेळी महिला व तरुणींना सॅनिटरी पॅड तसेच कपडे वाटप करण्यात येणार आहेत आणि महिलांनी स्वतःच्या आरोग्याची तसेच आपल्या वयात येणाऱ्या मुलींची काळजी कशी घ्यावी ?याबाबत त्यांच्याशी संवाद साधून व्याख्याना द्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत मंगरूळ शिवारात आयोजित करण्यात आला असल्याचे सपोनि.जयेंद्र भोयर व आश्रय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. सीमाताई वखरे यांनी सांगितले.
मीडिया पार्टनर - क्राईम बॉर्डर