CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
डोंबिवली(क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज डोंबिवलीत ही ठिकठिकाणी शिवसेनेने निदर्शने करत नारायण राणे यांचा विरोधात जाहिर निषेध केलेला पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असल्याचे दिसत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरातून याप्रकरणी शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया करण्यात आलेली पाहायला मिळत आहे. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना- युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नारायण राणे विरोधात जोरदार निदर्शने केली.
शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नारायण राणें विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच नारायण राणे यांच्या पुतळ्याला मारहाण करत तसेच कोंबड्या हवेत उडवून यावेळी शिवसैनिकांनी डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेतर्फे जाहिर निषेध करुण घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला सदर वेळी शिवसैनिक व पोलीस यांच्यातही काहीप्रमाणात झटापट झाल्याचे दिसुन आले तसेच डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात सर्व शिवसैनिकांनी एकत्र जमा होवून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठाना निवेदन पत्र दिले यावेळी वरिष्ठानी सदर निवेदन स्वीकारून आपण आपल्या वरिष्ठांशी चर्चा करुण या बाबत योग्य ती दखल घेवु असे सांगितले तसेच डोंबिवली शहरात कोणताही अनसूचित प्रकार घडू नये यासाठी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या वतीने डोंबिवली शहर शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे