CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
डोंंबिवली (क्राईम बॉर्डर): डोंबिवली विभागीय मनसे पदाधिकारी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ह्या वेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष व माजी परिवहन सभापती राजेश शांताराम कदम, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर रवींद्र जेधे, डोंबिवली शहर संघटक व माजी परिवहन सदस्य दिपक शांताराम भोसले,मनसे प्रदेश उपाध्यक्ष व जनहित कक्ष राहुल गणपुले, मनविसे डोंबिवली शहर सचिव कौस्तुभ फकडे, मनविसे शहर संघटक सचिन कस्तुर, मनसे शाखा अध्यक्ष स्वप्नील वाणी, मनसे उपशाखा अध्यक्ष निखिल साळुंखे, मनविसे शाखा अध्यक्ष कुणाल मोर्ये, शहर संघटक महेश कदम, राजेश मुणगेकर यांचा समावेश आहे.