CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोकणवासीयांसाठी बसेस आणि विशेष रेल्वे गाड्या सोडा..... - मनसे आमदार राजू पाटील....

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

कोकणवासीयांसाठी बसेस आणि विशेष रेल्वे गाड्या सोडा..... - मनसे आमदार राजू पाटील....

डोंबिवली : (सदाशिव वैद्य) ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ येथे कोकणातील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात राहतात. गणपतींसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना खासगी बसेस मनमानी भाडे आकारत आहेत.त्यामुळे कोकणवासियांसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्यास तसेच कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास या कठीण काळात त्यांना थोडा दिलासा मिळेल.अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नवीन ‘जन आरोग्य’ योजनेची मागणी

तसेच देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लागण झाल्यास रुग्णालयात उपचारासाठी येत असलेल्या खर्चामुळे सामान्य जनता हवालदिल झाली आहे. कोविड-19 रुग्णांना १०० टक्के मोफत उपचार देण्यासाठी, केंद्र शासनाशी चर्चा करून देश आणि राज्य पातळीवर विशेष बाब म्हणून नवीन ‘जन आरोग्य’ योजना आणून राज्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्याद्वारे ही मागणी करत ट्विट सुद्धा केले आहे.

 

याचबरोबर रुग्णांसाठी जीवनदायी असे #remdesivir_injection चा केईएम, शीव व नायर रुग्णालयासह १८ प्रमुख उपनगरीय रुग्णालयात एक महिना पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे,तसाच साठा #MMR_region मधील महापालिकांना पण उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे