CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोरोनाला हरवण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

कोरोनाला हरवण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आवाहन

ठाणे (प्रतिनिधी ) :- कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वयंशिस्त पाळुन जिल्हा आणि राज्य कोरोना मुक्त करण्याचा संकल्प करा असे आवाहन नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

 

यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल, सोनवणे, पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड,अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कोरोनाच्या संकटाविरोधात राज्याचं शासन, प्रशासन, संपूर्ण जनता आज एकजुटीनं लढत आहे, हे चित्र आश्वस्त करणारे आहे. आपण लवकरच कोरोनाला हरविणार आहोत. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा अशी विनंती देखील श्री शिंदे यांनी आपल्या संदेशाच्या माध्यमातून ठाणे जिल्हावासियांना केली आहे.