CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
डोंबिवली : एकीकडे कल्याण-डोंबिवलीतील कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असतांना कल्याण-डोंबिवलीकर सामाजिक अंतर पाळत नसल्याचे समोर येत आहेत.परंतु लॉकडाऊनला गांभीर्याने घेणारे लोकंही पाहायला मिळत आहेत.यामध्ये डोंबिवली पश्चिमेतील वृंदावन कॉम्प्लेक्स हि एक आदर्श व जागृत कॉम्प्लेक्स असल्याचे समोर आले आहे.दि.१४ एप्रिल ते ३ मे २०२० पर्यंत या कॉम्पलेक्सचे गेट रहिवाशांसाठी बंद करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२३ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली, तेव्हापासून पंतप्रधान , मुख्यमंत्री व प्रशासनाचे सर्व नियम वृंदावन कॉम्प्लेक्सचे पदाधिकारी व रहिवाशी पाळत आहेत. दि. १४ एप्रिल नंतर सोसायटीने या कॉम्प्लेक्स रहिवाश्यांवर कडक बंधन लावली आहेत. येथील रहिवाशांना कॉम्प्लेक्समध्ये ताजा भाजीपाला, दूध, फळे, मासे,औषधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत .या ठिकाणी आवश्यक वस्तूंचा साठा रहिवाशांपुरता करून ठेवण्यात आला आहे . फक्त इमर्जन्सी साठीच गेट ओपन करण्यात येते . विशेष म्हणजे या कॉम्प्लेक्सचा आदर्श घेण्यासारखा आहे.याठिकाणी घरकाम करणाऱ्या कामवाली बाई तसेच सिक्युरिटी गार्ड , वॉटर मॅन , माळी , स्विपर यांना सामाजिक बांधिलकी म्हणून एक महिना पुरेल एवढे रेशन त्यांनी भरून दिले आहे
या वृंदावन कॉम्प्लेक्स मध्ये एकूण सात विंग्स असून याठिकाणी ३३१ फ्लॅटस आहेत. या कॉम्प्लेक्स चे अध्यक्ष सचिन खैरे असून सचिव योगेश अंबुर्ले व प्रशांत महाजन हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कार्य करीत आहेत. प्रत्येक सोसायटीने असे नियम करण्याची नितांत गरज आहे.