CRIME BORDER | 26 December | 04:24 PM
डोंबिवली (क्रीडा प्रतिनिधी) : डोंबिवली पश्चिमेत राहणारी दिनकर सोमासे यांची कन्या आणि महात्मा गांधी विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कु. सई दिनकर सोमासे वय वर्ष १० ही अक्कलकोट येथे सुरू असलेल्या अकराव्या स्टेट युनिफाईट चॅम्पियनशिप २०२४ अक्कलकोट सुरू असलेल्या कराटे स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आहे .
दि. ३ फेब्रुवारी व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील श्री स्वामी समर्थांची पावन भूमी असलेल्या अक्कलकोट ही येथे स्पर्धा सुरू आहे .सब सिनियर ,ज्युनिअर खेळाडूंचे सामने होत आहेत त्यामध्ये कु. सई दिनकर सोमासे हिची निवड झालेली आहे.कु.सईने या आधी सातारा येथे स्टेट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत गोल्ड मेडल तसेच नंदुरबार येथे २०२३ मध्ये झालेल्या चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळवलेल आहे.
क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वखरे यांनी कु. सई हिचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.