CRIME BORDER | 26 December 2025 | 09:54 PM
कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक एका वर्षांनी पुढे ढकलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. युरो लिग, ला लिगा, इंग्लिश प्रीमिअर लीग आदी मोठ्या फुटबॉल स्पर्धाही रद्द झाल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका पुढे ढकलली. त्यात इंडियन प्रीमिअर लीगवरही अनिश्चिततेचं सावट आहे. अशात क्रिकेट स्पर्धा कधी सुरू होतील, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अशात एका दिग्गज खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानची स्टार खेळाडू साना मिर हिनं शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पाकिस्तान महिला संघाचे 15 वर्ष तिने प्रतिनिधित्व केले आहे. तिनं पाकिस्तानकडून 226 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 34 वर्षीय सानाच्या नावावर 120 वन डे आणि 106 ट्वेंटी-20 सामने आहेत.