CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

२१ जून पर्यत क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

CRIME BORDER | 26 December | 04:33 PM

ठाणे : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अबुल कलम आझाद ट्रॉफी ( विद्यापिठांसाठी),२०२१ साठी नामांकने सादर करण्याबाबत कळविले आहे. 

 

या पुरस्काराबाबतची नियमावली तसेच विहित नमुन्यातील अर्ज हे https://.yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिनांक २१ जून २०२१  रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावेत.

 

विहित कालावधी नंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. केंद्र शासनास surendra.yadav@nic.in किंवा girnish.kumar@nic.in या ईमेलवर सदर करावेत. अधिक माहिती साठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३६८७५५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती स्नेहल साळुंखे यांनी  केले आहे.