CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:06 PM

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने डिसेंबर, २०२५ पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धांसाठी महाविद्यालयांकडून दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. चवरे यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेची तालीम फेरी डिसेंबर, २०२५ पासून सुरु होणार असून जानेवारी, २०२६ मध्ये प्राथमिक व अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या स्पर्धेची विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात.
विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.
राज्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.