CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त अंबरनाथ मधील महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:06 PM

राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त अंबरनाथ मधील महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम संपन्न

ठाणे, - राज्यात राजश्री शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सामजिक न्याय दिन संमेलन सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे) यांच्या वतीने दि.5 जुलै 2024 रोजी महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ येथे कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी महाविद्यालयाचे उप प्राचार्य ए. आर. कूसुंबे, पर्यवेक्षक राजेश रोहिदास, महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी मेघा पवार व सर्व समतादूत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून श्री.गुरुनाथ देशमुख होते त्यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या जीवन चरित्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच नशा मुक्ती व व्यसन यावर खूप मार्मिक कविता सादर करून विद्यार्थांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा शेळके यांनी केले. समतादूत नितिन वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सामाजिक न्याय दिवस याबाबत थोडक्यात माहिती दिली. आभार प्रदर्शन जिल्हा प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनी केले.