CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाज्योतीच्या सीईटी/निट/जेईई 2025 प्रशिक्षणासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:06 PM

महाज्योतीच्या सीईटी/निट/जेईई 2025 प्रशिक्षणासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र संयुक्त प्रवेश परीक्षा (सीईटी)/जेईई/निट 2025 या परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर 31 मार्च 2023 पूर्वी अर्ज करावे, असे आवाहन महाज्योतीच्यावतीने करण्यात आले आहे.

महाज्योती मार्फत एमएचसीईटी/जेईई/निट या परीक्षांसाठीचे ऑनलाईन पद्धतीने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणात सबंधित परीक्षेतील गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयाच्या तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांमार्फत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात सहभागी उमेदवारांना टॅब तसेच त्यासाठी लागणारे इंटरनेटची (6 जीबी/प्रतिदिन) सुविधा तसेच परीक्षेसाठी लागणारे दर्जेदार अभ्यास साहित्य घरपोच देण्यात येते.

 

या योजनेसाठी खालील पात्रता आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी, उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी, उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी, जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा देत आहेत, ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

 

अर्ज करण्यासाठी इयत्ता 9 वी ची गुणपत्रिका, 10 वीची गुणपत्रिका, ओळखपत्र, विद्यार्थ्यांने 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा (बोनाफाईड प्रमाणपत्र), आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

 

या पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या https://mahajyoti.org.in/.../application-for-mht-cet-jee.../ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे, असे आवाहन महाज्योतीच्या प्रकल्प व्यवस्थापक श्वेता रहानगडाले यांनी केले आहे.