CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
Rajendra Vakhare
डोंबिवली : डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक फलाटावर भजन कार्यक्रम आयोजित केला जातो. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लहान जागेची मागणी स्थानिक आमदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत आमदार रवींद्र चव्हाण यांनी छोटी नव्हे तर निसर्गाच्या सानिध्यात प्रशस्त आणि सुसज्ज अशी भव्यवास्तू डोंबिवलीकर भजन भवन उभारली .या नवीन वास्तूचे लोकार्पण रविवारी त्यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले डोंबिवलीकर भजन भवन हे गणेश विसर्जन घाट गणेश नगर डोंबिवली पश्चिम येथे खाडे किनारी निसर्गरम्य ठिकाणी उभारण्यात आले असून या वास्तूचे शिल्पकार आमदार रवींद्र चव्हाण आहेत भजन हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि डोंबिवलीलाही या परंपरेचा वारसा लाभला आहे हे परंपरा जपण्याचे आहे तुने आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विकास निधीतून डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्था च्या मागणीनुसार ही वास्तुभारण्यात आली आहे रविवारी झालेल्या लोकांवर सोहळ्यात आमदार चव्हाण यांनी डोंबिवली कराशी स्नेहसंवाद साधला युवा गायक राजयोग धुरी यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
आमदार रवींद्र चव्हाण यांचा सहर्ष सत्कार
याप्रसंगी संस्थेतर्फे आमदार चव्हाण यांचा संत परंपरेला साजेशा पद्धतीने तंबोरा, चिपळ्या ,पुष्पगुच्छ आणि पगडी अर्पण करून सत्कार करण्यात आला . त्यांच्या स्वागताच्या वेळी परिसरात घोषणांचा गजर झाला आणि संपूर्ण वातावरण भजनमय झाले . या सोहळ्यासाठी लोकरे बुवा, शहाबाजकर बुवा, प्रमोद धुरी बुवा, मुळगेकर बुवा, भाई राणे बुवा, सतीश राणेबुवा तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, मा. जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, प्रदेश महामंत्री अनुसूचित जाती मोर्चा शशिकांत कांबळे ,मा. नगरसेवक राहुल दामले, जनार्दन म्हात्रे नं,दू म्हात्रे ,ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील ,राहुल म्हात्रे ,नंदू जोशी रेखाताई म्हात्रे आणि डोंबिवलीकर उपस्थित होते