CRIME BORDER | 18 December | 08:50 AM
श्रीक्षेत्र राजुर गणपती,जि.जालना ( सिकंदर शेख ) : हातनाबाद पोलीस स्टेशन चेइंचार्ज API.शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस चौकीचे पो.शि.संतोषकुमार वाडेकर यांच्या पुढाकाराने जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.संचारबंदीत लोकांची होत असलेली उपासमार पाहून खाकीतील माणूस जागा झाला.राजूर येथे पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस पो.शि.संतोषकुमार वाडेकर हे कडक शिस्तीचे म्हणून परिसरात परिचित आहेत.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनलोड आहे. वाडेकर हे गस्तीवर असतांना जालना रोडवरील पेट्रोल पंपाच्या मागे त्यांना काही लोक दिसले.त्यांनी त्या लोकांना हटकले असता त्यांनी सांगितले की,आम्ही उत्तर प्रदेशातून आलेलो आहोत. आम्ही घरून आणलेले व कमवलेले सर्व पैसे संपले असल्यामुळे आमच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. यावेळी पोलीसातीतील माणूस जागा झाला.त्यांनी त्या सर्वांना सोबत घेऊन किराणा दुकान गाठून जीवनावश्यक वस्तू घेऊन दिल्या.पो.शि.संतोषकुमार वाडेकर यांनी त्यांना सांगितले की,आता तुम्ही घराच्या बाहेर निघू नका काही गरज भासल्यास मला संपर्क करा.मी तुम्हाला जेवढी माझ्याकडून होईल तेवढी मदत मी करेन,असे सांगून पो.शि.संतोषकुमार वाडेकर यांनी त्यांना स्वखर्चाने जीवनाश्यक वस्तू घेऊन दिल्या. त्या लोकांनी त्यांचे आभार व्यक्त केले व त्यांना सांगितले कि,तुमच्या सूचनेचे पालन आम्ही करू.हा खाकीतील माणूस श्रीक्षेत्र राजूर येथील परप्रांतियांच्या मदतीसाठी धावून आला.