CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
राजेंद्र वखरे यांजकडून
डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स दर महिन्याला अन्नदान कार्यक्रम विविध संस्थेमध्ये साजरा करीत असते. रोटरीच्या मासिक नियोजनानुसार सोनिवली- एरंजाड रोड , यादव नगर , बदलापूर पश्चिम, जिल्हा ठाणे या ठिकाणी वसलेल्या सत्कर्म बालकाश्रमातील ३२ मुलासोबत विरंगुळा व दोन वेळेचे अन्नदान , मुलांसोबत चर्चासत्र कार्यक्रम संपन्न झाला.
सत्कर्म बालकाश्रम यावर्षी २५ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या संस्थेत एकूण ३२ विद्यार्थी असून या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात येतात. येथील विद्यार्थी शिक्षणासोबत संगीत , चित्रकला व विविध उपक्रमात भाग घेत असतात.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स चे प्रेसिडेंट बॉबी पिंटो यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, रोटेरियन यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
रोटरी तर्फे या सत्कर्म बालकाश्रमास तांदूळ , डाळ व दोन वेळेचे जेवण देण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी रोटरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच येथील संस्थेचे कार्यकारी मंडळातील सभासद राघवेंद्र देशपांडे सर व्यवस्थापक अधीक्षक विजय जाधव सर यांनी सत्कर्म बालकाश्रमाची सुरुवात कशी झाली व त्यांचे उपक्रम व पुढील मनोदय व्यक्त केला.
यावेळी शैलेश गोर यांचा वाढदिवस बालकाश्रमात बालकांना चॉकलेट देऊन साजरा करण्यात आला
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेला भेट दिल्याबद्दल सभासद राघवेंद्र देशपांडे सर व अधीक्षक विजय जाधव सर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी क्लबचे प्रेसिडेंट बॉबी पिंटो, रोटेरियन शैलेश गोर, निलेश सोनवणे ,प्रशांत बापट, पुरुषोत्तम रानडे, गजानन धर्माधिकारी, रोटेरियन क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे यांनी या प्रोजेक्टमध्ये हिरीरीने सहवाग घेतला.
