CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स ने दिली मुरबाडच्या पॉज संस्थेला भेट

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स ने दिली मुरबाडच्या पॉज संस्थेला भेट

( राजेंद्र वखरे यांजकडून )

डोंबिवली : रोटरी संपूर्ण जगामध्ये विविध देशात सामाजिक उपक्रम राबवित असते . या संस्थेद्वारा अनेक गोरगरीब व गरजू लोकांना त्यांची मदत होत असते तसेच आपल्या भारतात देखील विविध राज्यात, शहरात रोटरी क्लबच्या विविध शाखा कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे डोंबिवली शहरांमध्ये सुद्धा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स ही शाखा कार्यरत आहे. या क्लबचे विद्यमान प्रेसिडेंट बॉबी पिंटो हे असून सेक्रेटरी उज्वल ठोंबरे हे आहेत.

जिल्हास्तरावर पशुरक्षक हे सदर राबविण्यात येते.‌ त्यानुसार प्रेसिडेंट बॉबी पिंटो यांनी रोटरीच्या पाक्षिक बैठकीमध्ये पशुरक्षक कार्यक्रम राबविण्याचे सर्वानुमते ठरविले. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात मुरबाड शहरापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर वसलेल्या पशुपक्षासाठी कार्यरत असलेल्या पॉज या संस्थेस भेट देण्याचे ठरले.

त्यानुसार दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी पॉज (प्लॅंट अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी ) संस्थेत असलेल्या ६० डॉगी करिता तांदूळ व त्यांना खाण्याचे साहित्य घेऊन रोटरीच्या ०५ लोकांची टीम त्या ठिकाणी पोहोचली. शहरापासून दूर वसलेल्या पॉज संस्थेत एकूण ६० डॉगी असून त्यामध्ये काही जखमी तर काही कॅन्सरग्रस्त तसेच आजारी असे डॉगी त्या ठिकाणी आढळून आले.

या संस्थेचे संचालक डॉ. निलेश भणगे हे त्यांच्या स्टाफसह गेल्या २५ वर्षापासून या डॉगींची सेवा करीत आहेत. या ठिकाणी जवळपासच्या शहरातून जखमी, भटके आजारी असलेले डॉगी लोकं आणून सोडतात किंवा कुठे अपघात ग्रस्त डॉगी ,पशुपक्षी आढळले तर त्यांना फोन कॉल करून बोलवून घेतात . डॉ . निलेश भणगे मग त्यांच्यावर पशू तज्ञ चिकित्सक कडून उपचार करून , शस्त्रक्रिया करून त्या डॉगींना त्यांच्या पशु रुग्णवाहिकेतून ज्या ठिकाणांहून आणले आहेत . त्या पत्त्यावर पुन्हा नेऊन सोडत असतात परंतु काही वेळेस काही लोकं हे खोटा ऍड्रेस कळवून डॉगींना सोडतात. त्यामुळे अशा डॉगींना त्या ठिकाणी सोडतांना त्रास होतो. मग अशांना डॉ . निलेश भणगे त्यांच्या संस्थेत कायमचे ठेवून घेत असतात.

पॉज संस्थेचे संस्थापक डॉ . निलेश भणगे यांच्याशी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विविध विषयावर चर्चा केली. त्यांना येणाऱ्या अडचणी व मदत करणाऱ्या लोकांबद्दल डॉ. निलेश यांनी तोंड भरून कौतुक करत आभार मानले. त्याचबरोबर रोटरी क्लब ने येऊन या संस्थेत भेट दिल्याबद्दल त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. पुन्हा संस्थेस भेट द्या असे आवर्जून सांगितले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स चे प्रेसिडेंट बॉबी पिंटो तसेच रोटेरियन निलेश सोनवणे , रोटेरियन शैलेश गोर, रोटेरियन तथा क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे , रोटेरियन नाटेकर हे उपस्थित होते.

पत्रकार / रोटेरियन राजेंद्र वखरे यांनी क्राईम बॉर्डर च्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला.