CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महिलेच्या विनयभंग प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

महिलेच्या विनयभंग प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेत एका महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकिस आला असून रामनगर पोलीसांनी श्रीकेश शिवयश चौबे या इसमावर गुन्ह्याची नोंद केली आहे. चौबे विरोधात एका ४५ वर्षीय महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार सदर ४५ वर्षीय महिला डोंबिवली पूर्वेतील नेहरू रोड, भाजी मार्केट येथून जात असताना श्रीकेश चौबे याने तिचा विनयभंग करत तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले. त्यावेळी तिने आरडा ओरड केला तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत त्याला पकडले व रामनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.

श्रीकेश चौबे याच्यावर बी. एन. एस. कलम 74, 75 ,115 (2) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पुढील गुन्ह्याचा तपास डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस करीत आहेत.