Important:
- To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now
बीड ( सिकंदर शेख ) - आपत्ती व्यवस्थापनचे जवान रात्रंदिवस कोरोनाच्या युद्धात स्वतःला झोकून देशसेवा व आपले कर्तव्य निभावत आहेत. गाव व शहरात पेट्रोलिंग, गर्दी न होऊ देने, शहरात व गावात शांतता राहण्यासाठी हे जवान पोलीस च्या बरोबर काम करत आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथक आज प्रत्येक खेड्यात वाडी वस्तीत जाऊन लोकांनी गावात व चौकात गर्दी करू नये म्हणून पेट्रोलिग च्या मार्फत काळजी घेत आहेत. या जवानांचे रूट मार्च च्या वेळेस नागरिकांनी अंगावर फुले टाकून व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला .
या अगोदर या टीम ने महापुर आला होता तेंव्हा सांगली / कोल्हापूर व आषाढी एकादशीला पंढरपूर येथे नागरिकांना पाण्यातून वाचवण्याचे काम केले व इतर मदत केली. तसेच गणपती व शिवजयंती बंदोबस्त असे अनेक प्रकारचे बंदोबस्त करून शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम केले या मुळे पूर्ण टीम चे अभिनंदन व सत्कार केज च्या नागरिकांनी केले।
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. पूर्ण शहरात व गावागावात आज या कोरोनाच्या युद्धात पूर्ण टीम नागरिकाच्या मदतीसाठी तयार आहे असे या पथकाचे प्रमुख सुरज कदम यांनी सांगितले.