CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अल्पवयीन मुलीवर शंभरहून जास्त पुरुषांनी केलं दुष्कृत्य?; नऊ जणांना अटक, आरोपीत गुजरातीसह बांगलादेशींचा समावेश

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

अल्पवयीन मुलीवर शंभरहून जास्त पुरुषांनी केलं दुष्कृत्य?; नऊ जणांना अटक, आरोपीत गुजरातीसह बांगलादेशींचा समावेश

बांगलादेशमधील मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याची धक्कादायक माहिती मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या तपासात समोर आली. या प्रकरणात नऊ जणांना अटक केली आहे.

वसई- बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीला परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून घर सोडून भारतात येणं महागात पडलं आहे. तिला एका महिलेनं भारतात वेश्या व्यवसायात ढकललं. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी नऊ आरोपींना अटकसुद्धा केली आहे. खालीद बापारी, जुबेर शेख, शमीम सरदार, रुबी बेगम बापारी, उज्जल कुंडू, परवीन कुंडू, प्रीतीबेन मोहिडा, अनिकेत पटेल आणि सोहेल शेख अशी आरोपींची नावे आहेत. यामधील चार जण गुजराती तर इतर बांगलादेशी आरोपी आहेत.

बांगलादेशमधील पीडित अल्पवयीन मुलीला नोकरीचं आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. बांगलादेशातून मुंबईत आणि देशभरात वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेनं केला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

धाड टाकण्यात आल्यानंतर तिघींची सुटका- गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये वेश्यागमन करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती पीडित मुलीनं दिली आहे. तीन महिन्यांत शेकडो लोकांनी तिच्यासोबत शय्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी धाड टाकत सेक्स रॅकेटमधून साडेबारा वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केलीय. त्याचवेळी तिच्यासोबत अजून २ सज्ञान पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. तसेच सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नराधमांनाही पोलिसांनी अटक केली.

शंभरहून जास्त अधिक पुरुषांनी केलं दुष्कृत्य- मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे. वसईच्या नायगावमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमधून एका १२ वर्ष पाच महिन्याच्या अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, सुटका होताच तिनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. तीन महिन्यांत शंभरहून जास्त अधिक पुरूषांनी दुष्कृत्य केल्याची माहिती तिनं पोलिसांना दिली.

बनावट आधारकार्ड बनवलं- पीडित मुलीला दलालांनी गुजरातमधील नाडियाद येथे नेलं होतं. पीडित मुलगी बारा वर्षाची असताना तिचं बनावट आधार कार्ड बनवून २१ वर्षाची दाखवण्यात आलं. ते आधारकार्ड नायगाव पोलिसांनी जप्त केलं आहे. मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयानं वेगवेगळी पथक पाठवून यातील अनेक आरोपींचा शोध घेतला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. नायगाव पोलिसांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. आमचा तपास सुरू असून आणखीनं आरोपींना पकडण्यात येणार आहे. तपास संपल्यावर माहिती देऊ, असे पोलिसांनी सांगितलं आहे.

बांगलादेशच्या मुली आणि महिलांचा वेश्याव्यवसायात वापर- अनेक बांगलादेशी भारतात घुसखोरी करतात. अनेकदा पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांगलादेशींना पकडले जातं. मात्र त्यांच्यावर ठोस उपाययोजना करताना आपलं सरकार दिसत नाही. कारण, यामध्ये घरचेच भेदी असल्यानं विदेशातील नागरिकांना भारतात राहणं सोयीचं झालं आहे. जोपर्यंत अशा घरभेद्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई शासन करत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. वेश्याव्यवसायात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी महिला आणि मुली यांचा वापर केला जात आहे. sabhar -ETV Bharat Marathi Team-Published : August 12, 2025 at 7:53 AM IST