CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

श्री कपिलेश्वर महादेव मंदिर मुकुट मिरवणूक जीर्णोद्धाराचा शुभारंभ उत्साहात संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

श्री कपिलेश्वर महादेव मंदिर मुकुट मिरवणूक जीर्णोद्धाराचा शुभारंभ उत्साहात संपन्न

नयना चौधरी / प्राजक्ता चौधरी

वरणगाव : वेल्हाळे तालुका भुसावल : - वेल्हाळे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात पारंपारिक व भक्ती भावाने मुकुटयात्रा महोत्सव साजरा करण्यात आला या सोहळ्यात पावसाची रिमझिम सुरू असूनही गावातील नागरिकांसह भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या महोत्सवात जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मंदिर ट्रस्ट अध्यक्ष पंढरीनाथ महाराज व सर्व सदस्य तसेच विविध संत महंत व गावातील मान्यवरांची उपस्थिती होती. या मिरवणुकीत ढोल ताशा पथक, बँड ,मर्दानी खेळ प्रात्यक्षिक पालखी आणि सजवलेला मुकुट घेऊन शेकडो भक्त सहभागी झाले होते.

या मुकुट यात्रेच्या निमित्ताने कपिलेश्वर महादेव मंदिराच्या हेमांडपंथी वास्तुशैलीतील ऐतिहासिक मंदिराचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला धार्मिक विधी पूजा अर्चा अभिषेक तसेच सूर्यभान महाराज यांच्या कीर्तनाचे व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रावण सोमवार निमित्त फराळ वाटप करण्यात आले . कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी गड व किल्ले संवर्धन योजनेअंतर्गत आवश्यक निधी मंजूर करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रयत्नशील आहे असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

तालुक्यातील ऐतिहासिक पुरातन तत्व अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या वेल्हाळे गावातील अकराव्या शतकातील यादवकालीन हेमांडपंथी कपिलेश्वर महादेव मंदिर हे दगडावर केलेले कोरीव काम आहे. मंदिरातील महादेवाची पिंड ही कोरीव श्री यंत्रावर बसवलेली आहे . याच मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुकुट पूजन व महाआरती सोहळा भक्ती भावाने पार पडला तसेच पुणे व त्र्यंबकेश्वर येथील स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सामाजिक कार्यकर्ते व समितीचे सचिव पंकज पाटील आणि गावातील समस्त युवा कार्यकर्त्यांनी व सूत्रसंचालन आकाश कुरकुरे यांनी केले तसेच वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय अमित कुमार बागुल पीएसआय श्रावण जवरे तसेच पीएसआय जैन ,हेड कॉन्स्टेबल बाविस्कर आदींनी बंदोबस्त चोख ठेवला होता