CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रायते येथे राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीमार्फत शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न, जि.प.शाळा व रायते विभाग हायस्कूल रायते विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

रायते येथे राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीमार्फत शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न, जि.प.शाळा व रायते विभाग हायस्कूल रायते विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

राजेंद्र वखरे यांजकडून

डोंबिवली : सालाबाद प्रमाणे राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीमार्फत संपूर्ण भारतभर विविध राज्यात व विविध जिल्ह्यात समितीच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा व आश्रम शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते. त्यानुसार यावर्षीही शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. समितीचे ठाणे जिल्हास्तरावरील पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरवर्षी जिल्हा परिषद शाळा,रायते या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात येत होते परंतु यावर्षी रायते विभाग हायस्कूल, रायते ज्यूनियर कॉलेज येथील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन रायते विभाग हायस्कूल रायते जुनिअर कॉलेज येथे आयोजित करण्यात आले होते .या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा येथील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना तसेच हायस्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायते ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. समिता संतोष सुरोशी होत्या . तर अतिथी म्हणून क्राईम बॉर्डरचे संपादक तथा विष्णूनगर पोलीस स्टेशन डोंबिवली च्या शांतता कमिटीचे सदस्य राजेंद्र वखरे ,ग्रामपंचायत सदस्य हरीश पवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले. तर आभार ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांनी मानले

यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी, क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे,सरपंच सौ. समिता सुरोशी , मुख्याध्यापक शिंदे सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चित्रा बोंदे मॅडम, सौ. जाधव मॅडम , सौ. राठोड मॅडम ,पत्रकार साईनाथ ठाकरे उपस्थित होते .सदर कार्यक्रमाला विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.