CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया -राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया -राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

ठाणे :- आपण सर्वांनी मिळून संकल्प करुया, महिलांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्य काम करेल, अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करुया, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी आज कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 (POSH act) नुसार अंतर्गत समितीच्या अध्यक्षांकरिता जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत केले.

या प्रशिक्षण कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या शिवानी डे, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉ.पद्मश्री बैनाडे, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तालयातील परिविक्षा अधीक्षक दत्तात्रय मुंडे, विभागीय उपायुक्त सुवर्णा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, पौर्णिमा चौगुले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे यांच्यासह विविध शासकीय कार्यालयातील POSH ACT नुसार गठीत अंतर्गत समिती (IC) अध्यक्ष तसेच आपल्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील IC अध्यक्ष, महिला अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर पुढे म्हणाल्या की, हा कायदा सर्वांसाठी समान असून राष्ट्रीय महिला आयोग हे महिलांच्या सर्वांगिण विकास, पीडित, शोषित महिलांना न्याय मिळवून देणे, महिलांना सन्मान, आर्थिक सशक्तीकरण यासाठी काम पाहते. महिलांसाठी देशामध्ये वेगवेगळे 17 सेल कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कामे केली जातात. महिलांसाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येते, परंतू काही कार्यालयांमध्ये समित्या फक्त कागदावर आहेत. त्या प्रत्यक्षात काम करत नाहीत. या समितीला सिव्हील कोर्टाचे अधिकार आहेत. या समितीकडे आलेल्या तक्रारीची नि:पक्षपातीपणे, गोपनीयतेने चौकशी करुन न्याय देण्याचे काम करते. सर्व कार्यालयांमध्ये 3 महिन्यातून एकदा समितीची बैठक घेण्यात यावी. यामध्ये चर्चा करुन महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांचा परिचय करुन दिला. जिल्ह्यामधील तक्रार निवारण समितीचा आढावा सादर केला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला पाणी घालून व दिप प्रज्वलनाने झाली. श्रीमती विजया रहाटकर यांचे स्वागत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ, तुळशीचे रोप, पुस्तक आणि शासनाचे मुखपत्र "लोकराज्य" मासिकाचे अंक देवून केले.

या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या तुनिका शर्मा यांनी POSH ACT विषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व नागरी व ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा वडेकर यांनी केले.