CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
शहापूर शहरातील एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये १० ते १२ विद्यार्थिनींचा मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
ठाणे : शहापुरातील एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या, १० ते १२ विद्यार्थिनींचा मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने, विवस्त्र करून छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थींनीच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्यध्यापिकेसह ५ शिक्षिका आणि शाळा प्रशासन व्यस्थापन समितीत असलेल्या दोन महिला अशा आठ महिलांवर शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. तर मुख्यधापिकेसह एक महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. तर उद्या (10 जुलै) या दोघींना न्यायालयात हजर करणार येणार आहे.
काय आहे घटना? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापुरातील एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये ३०० च्या जवळपास मुली शिक्षण घेतात. त्यातच ८ जुलै रोजी सकाळी १० ते १२ च्या सुमारास मुख्यध्यापिका यांनी शाळेच्या हॉलमध्ये मुलींना एकत्रित बोलावलं. त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरुमच्या लादीवर असलेले रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवून मासिक पाळी आली आहे किंवा नाही? याबाबत विचारणा पीडित विद्यार्थीनींकडे केली. त्यानंतर ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास ५ शिक्षिकाना सांगितलं. तसंच ज्या मुलींना मासिक पाळी आली नाही त्यांना बाथरुममध्ये नेवून त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचं महिला कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी : या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी आज (९ जुलै रोजी) शाळा गाठली. तसेच मुलींसोबत घडलेल्या प्रकाराचा जाब विचारत शाळेत गोंधळ घातला. दुसरीकडं इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा पद्धतानं या विद्यार्थ्यींनीना विवस्त्र करण्याचा लाजस्पद आणि केविलवाणा प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलींच्या पालकांनी केला आहे. आज दुपारपर्यंत शाळेमध्ये पालक आणि शालेय प्रशासन यांच्यात वादविवाद झाला. सर्व पालकांनी एकत्र येत जोपर्यंत स्कूलमध्ये मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका घेत गोंधळ घातला होता.sabhar etvbhart