CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या वतीने "खेळ व आरोग्य" निबंध स्पर्धेचे आयोजन : आरोग्य जनजागृती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या वतीने "खेळ व आरोग्य" निबंध स्पर्धेचे आयोजन : आरोग्य जनजागृती

राजेंद्र वखरे यांजकडून

डोंबिवली : आशुतोष डुंबरे , पोलीस आयुक्त , ठाणे शहर , डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण ,सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर , संजय जाधव ,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग ,कल्याण, अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ - ३, कल्याण, सुहास हेमाडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग , डोंबिवली, यांच्या मार्गदर्शनाखाली व विष्णुनगर पोलीस ठाणे स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली .

सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल, ठाकूरवाडी डोंबिवली येथील विद्यार्थ्यांचे " खेळ व आरोग्य " या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन दि. ७ जुलै २०२५ रोजी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करणे व विविध खेळाची जोपासना करणे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूलचे ट्रस्टी तथा क्राईम बॉर्डर चे प्रबंध संपादक महेश भोईर व ट्रस्टी व क्राईम बॉर्डर चे सहसंपादक संतोष भोईर, प्रिन्सिपल गणेश भोईर , व विष्णू नगर पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटीचे सदस्य ,क्राईम बॉर्डर चे संपादक तथा रोटेरियन राजेंद्र वखरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ .सायली पळसेकर तसेच शिक्षक वृंद व पोलीस बांधव उपस्थित होते .

विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी पोलीस बांधवांनी चॉकलेटचे वाटप केले. या निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.या निबंध स्पर्धेतून प्रथम , द्वितीय, व तृतीय असे क्रमांक काढून दोन उत्तेजनार्थ सन्मानपत्र देण्यात येणार असून उर्वरित विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

al;