CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : राजेंद्र वखरे यांजकडून
डोंबिवली : मा.श्री .आशुतोष डुंबरे , पोलीस आयुक्त , ठाणे शहर , मा. श्री. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण ,सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर , मा. श्री. संजय जाधव ,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग ,कल्याण, मा. श्री. अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ - ३, कल्याण, मा. श्री. सुहास हेमाडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग , डोंबिवली, यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे , मानपाडा पोलीस ठाणे व विष्णूनगर पोलीस ठाणे यांचे अंतर्गत तपास करून हस्तगत करण्यात आलेले मोबाईल वाटप कार्यक्रम डोंबिवली पूर्वेतील, लेवा भवन हॉल , दत्तनगर , डोंबिवली पूर्व येथे संपन्न झाला.
सहाय्यक पोलीस आयुक्त ,डोंबिवली विभाग यांचे अंतर्गत असलेले डोंबिवली पोलीस ठाणे ,मानपाडा पोलीस ठाणे व विष्णूनगर पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चोरीस गेलेले ,हरवलेले मोबाईल तपास करून ते पुन्हा मुळ मालकांकडे सुपूर्द केले . यामध्ये डोंबिवली पोलीस ठाणे यांचे कडील २३ मोबाईल एकूण किंमत ३,१२०००/- रुपये तसेच मानपाडा पोलीस ठाणे यांचे कडील २४ मोबाईल एकूण किंमत ४,८१०००/- रुपये विष्णूनगर पोलीस ठाणे यांचेकडील २४ मोबाईल एकूण किंमत ४३५०००/- रुपये असा एकूण ७१ मोबाईलची किंमत १२,२८,०००/- रुपये किमतीचे मोबाईल हे त्यांचे मूळ मालकांना परत करण्यात आले. तपास पथक यांनी लोकेशन ट्रेकिंग आणि डिजिटल साधनांचा सी. ई. आय . आर पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषण करून अनेक गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधून काढले .
सदरचे मोबाईल मुळमालक यांना श्री . सुहास हेमाडे ,सहायक पोलीस आयुक्त ,डोंबिवली विभाग ,श्री., गणेश जवादवाड ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे,श्री., संदिपान शिंदे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस, ठाणे श्री, संजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे ,श्री दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (प्रशा. ) , मानपाडा पोलीस स्टेशन, जेष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र वखरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
नागरिकांना संबोधित करतांना सहायक पोलीस आयुक्त ,सुहास हेमाडे म्हणाले की ,आपल्या हरविलेल्या वस्तू परत मिळणे हा प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण आहे. पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोठ्या मेहनतीने मोबाईलचा शोध घेऊन ते तक्रारदार यांना परत करीत असताना लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद सगळं काही सांगून जातो.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.श्री .आशुतोष डुंबरे , पोलीस आयुक्त , ठाणे शहर , मा. श्री. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण ,सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर , मा. श्री. संजय जाधव ,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग ,कल्याण, मा. श्री. अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ - ३, कल्याण, मा. श्री. सुहास हेमाडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग , डोंबिवली यांनी डोंबिवली विभागात विशेष तपास पथकाची स्थापना करून सी. ई . आय. आर . पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषण करून अनेक गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले किंवा हरविलेले मोबाईल शोधून काढले आहेत. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीसांचे आभार मानून आनंद व्यक्त केला. यामध्ये सन २०२४ व २०२५ मधील हरविलेल्या मोबाईलचा प्रामुख्याने समावेश होता.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. गणेश जवादवाड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस स्टेशन यांनी केले. यामध्ये त्यांनी सायबर गुन्ह्याबाबत माहिती देऊन जनजागृती केली . कार्यक्रमाचा समारोप माननीय श्री . सुहास हेमाडे ,सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी उपस्थित नागरिकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला