CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त डोंबिवली विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री .संजय जाधव , अपर पोलीस आयुक्त ,पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण ,मा. श्री .अतुल झेंडे ,पोलीस उप आयुक्त ,परिमंडळ - ३, कल्याण,मा. श्री. सुहास हेमाडे , सहायक पोलीस आयुक्त , डोंबिवली, विभाग डोंबिवली, मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली, रामनगर ,पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती आठवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
त्या अनुषंगाने डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाणे अंतर्गत विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील काही उपक्रम खालील प्रमाणे
अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जन गण मन स्कूल डोंबिवली पश्चिम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, अमली पदार्थ सेवन न करणे बाबत तसेच गुड टच बॅड टच या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर वेळी पोलीस निरीक्षक श्री. जी. एस. गमे (गुन्हे), प्रमुख वक्ते अँङ. श्वेता बाबर ,अँङ. तृप्ती पाटील ,श्री धर्मेंद्र नलावडे (सायबर एक्सपर्ट), श्रीमती सुवर्णा मॅडम (सायबर एक्सपर्ट) यांनी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्या अडीअडचणीवर चर्चा करण्यात आली असून सदर कार्यक्रमा दरम्यान १ पोलीस निरीक्षक,३ पोलीस अमलदार, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व १२५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.