CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री .संजय जाधव , अपर पोलीस आयुक्त ,पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण ,मा. श्री .अतुल झेंडे ,पोलीस उप आयुक्त ,परिमंडळ - ३, कल्याण,मा. श्री. सुहास हेमाडे , सहायक पोलीस आयुक्त , डोंबिवली, विभाग डोंबिवली, मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली, रामनगर ,पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती आठवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
त्या अनुषंगाने डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील काही उपक्रम खालील प्रमाणे
दिनांक २४ जून २०२५ रोजी डी . एन .सी. विद्यालय , डोंबिवली पूर्व येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . प्रवीण घुटुगडे व पोलीस हवालदार श्री. गणेश गिते यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती व कार्यक्रम घेतला. यावेळी दोन शिक्षक व ७०/८० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या उपक्रमात उपस्थित होते .
त्याचबरोबर दिनांक २५ जून २०२५ रोजी स.वा . जोशी विद्यालय व महाविद्यालय डोंबिवली (पूर्व) येथे सहायक पोलीस निरीक्षक श्री.एल .बी. बोरा , पोलीस हवालदार श्री .गणेश गिते ,पोलीस अंमलदार श्री.अमित देसाई यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेतला.सदर वेळी श्री. नलावडे मुख्याध्यापक व सात शिक्षक तसेच दीडशे (१५०) विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
दिनांक २५ जून २०२५ रोजी बी. आर. मढवी कॉलेज, डोंबिवली येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश जवादवाड, श्री. अमोल मडामे (नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य) व सहायक पोलीस निरीक्षक श्री. एल . बी . बोरा यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेतला. सदर वेळी प्राचार्य , सहा शिक्षक व दीडशे (१५०) विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.सदर अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वरील विद्यार्थ्यांना माहिती देऊन अंमली पदार्थांचे सेवनापासून परावृत्त करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तींकडून खाद्यपदार्थ स्विकारू नये. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य बदलू शकते. अंमली पदार्थांचे सेवन हे क्षणिक समाधान देत, पण कायमस्वरूपी वेदना आणि विनाश मागे ठेवते. आई-वडिलांची स्वप्न , मित्रांची साथ , स्वतःचे भविष्य, सगळं संपवतं. आज एक पाऊल पुढे टाका, ड्रग्जला नाही म्हणा आणि आयुष्याला हो म्हणा .अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण ,चला नशा मुक्त भारत घडवूया .नशा नाही ,दिशा हवी तसेच चरस ,गांजा सेवन करतांना किंवा विक्री करताना कोणीही आढळल्यास डायल 112 यावर माहिती द्या. आपला क्रमांक गोपनीय ठेवला जाईल . याबाबत जनजागृती करण्यात आली .
