CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (राजेंद्र वखरे यांजकडून) : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सने दिनांक ०७ व ०८ जून २०२५ रोजी डोंबिवलीतील आदित्य मंगल कार्यालयात दोन दिवसाचे प्रदर्शन व विक्री , संक्रमण -२ आयोजित केले होते.सदर प्रदर्शनाचे उद्घाटन दि.०७ जून २०२५ रोजी सकाळी दहा वाजता ३१४२ चे ए जी अर्थात असिस्टंट गव्हर्नर श्री. महेंद्र हिंगोरणी यांच्या हस्ते झाले .
यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सचे प्रेसिडेंट श्री.किशोर मुळे , सेक्रेटरी श्री .बॉबी पिंटो, प्रोजेक्ट हेड सिद्धी पेंढारकर आणि श्री .प्रशांत दामले, ज्येष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र वखरे तसेच संक्रमण - २ ची टीम उपस्थित होती.
सदर रोटरी तर्फे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सच्या वतीने या वर्षातील हे दुसरे प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनात ५० हून अधिक व्यावसायिकांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.यावेळी बदलापूर व कोल्हापूर च्या व्यवसायिकांनी सहभाग घेतल्याने ही उल्लेखनीय बाब ठरली.यावेळी डोंबिवली, कल्याण,ठाणे व परिसरातील विविध व्यवसायिकांनी आपले स्टॉल प्रदर्शन स्थळी लावले होते.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. अत्यंत महत्त्वाच्या विविध प्रकारच्या ३२ चाचण्या यावेळी करण्यात आल्या.या शिबिराला डोंबिवली मधील सुप्रसिद्ध डॉ. श्री. हर्डीकर यांनी भेट देऊन आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरात ७० हून अधिक लोकांनी या शिबिराचा फायदा घेतला.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनात रोटरी क्लबच्या ब्रीद वाक्याला अनुसरून दोन स्टॉल दिव्यांग व्यक्तींसाठी देण्यात आले होते.
डोंबिवलीतील या दोन दिवशीय प्रदर्शन विक्री , संक्रमण २ ला डोंबिवली व परिसरातील लोकांनी भेट देऊन भरभरून प्रतिसाद दिला आणि वस्तूची खरेदी करून प्रदर्शनातील व्यवसायिकांना प्रोत्साहन दिले.
डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट, कुर्ला आणि रासने ग्रूप रिॲलिटी बिझनेस यांनी ह्या प्रदर्शनासाठी आर्थिक मदत केली.
संक्रमण दोन मध्ये कॉस्मेटिक, इमिटेशन ज्वेलरी, ड्रेस मटेरियल, गिफ्ट आर्टिकल, कोकण फुड्स, रेडी टू इट पदार्थांचे स्टॉल होते.संक्रमण टू म्हणजे नुसते प्रदर्शन नाही तर इथे मुलांना व्यवसायाभिमुख शैक्षणिक मार्गदर्शन करणारे स्टॉलही होते.
सदर कार्यक्रम हा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सचे प्रेसिडेंट श्री.किशोर मुळे व सेक्रेटरी श्री.बॉबी पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट हेड सिद्धी पेंढारकर व टीमने यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.