CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बेकायदेशीर पेस्ट कंट्रोल कामगारांबाबत जागरूकता आणि त्यांना काम न देण्याचे आवाहन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

बेकायदेशीर पेस्ट कंट्रोल कामगारांबाबत जागरूकता आणि त्यांना काम न देण्याचे आवाहन

ठाणे :- परवाना प्राधिकरणा (Licensing Authority) द्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, किटकनाशक कायदा 1968 व किटनाशक अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार त्यांनी शहरात अनधिकृतपणे पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांबाबत जागरूक राहावे आणि त्यांना कोणतेही काम देऊ नये.

गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की अनेक व्यक्ती कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, तसेच आवश्यक ज्ञान आणि कौशल्याशिवाय पेस्ट कंट्रोल चे काम करत आहेत. या बेकायदेशीर कृत्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. हे अनधिकृत कामगार निकृष्ट दर्जाची आणि धोकादायक रसायने वापरण्याची शक्यता असते, ज्यामुळे विषबाधा किंवा इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

या व्यतिरिक्त, अशा अनधिकृत व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता देखील असते. ते अर्धवट काम करून पैसे उकळू शकतात किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार करून मालमत्तेचे नुकसान करू शकतात. अधिकृत परवानाधारक पेस्ट कंट्रोल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि कामगार यांच्यावर शासनाचे नियंत्रण असते आणि ते विशिष्ट नियमांनुसार काम करतात. त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवा सुरक्षित आणि प्रभावी असतात.

त्यामुळे, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा संस्थेकडून पेस्ट कंट्रोल सेवा घेण्यापूर्वी, त्यांच्या अधिकृत परवान्याची आणि नोंदणीची खात्री करावी. अतिशय कमी दरात सेवा देणाऱ्या संशयास्पद व्यक्तींपासून सावध राहावे. केवळ अधिकृत आणि नोंदणीकृत पेस्ट कंट्रोल सेवा पुरवणाऱ्यांनाच आपल्या घरी किंवा आस्थापनेत काम करण्याची परवानगी द्यावी. बेकायदेशीर पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांना काम देणे हे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे, तर आपल्या मालमत्तेसाठी देखील धोकादायक ठरू शकते. जर आपल्या परिसरात कोणी अनधिकृतपणे पेस्ट कंट्रोल करताना आढळल्यास, तात्काळ भ्रमणध्वनी क्र. ७०३९९४४६८९ व ८२०८८५५९७० वर परवाना अधिकाऱ्यास त्याची माहिती द्यावी, अशा पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांच्यावर किटकनाशक कायदा 1968 व किटनाशक अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल, असे आवाहन परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे यांनी केले आहे.