CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांनी दि.31 मार्च 2025 पर्यत ई के.वाय.सी. पूर्ण करावी

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :- महाराष्ट्र शासनाच्या सर्व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांची व शिधापत्रिकेत नाव समाविष्ट असलेल्या सदस्यांची ई- के.वाय.सी. दि.31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याने ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्र, नवी दिल्ली यांनी “मेरा ई-के.वाय.सी.” मोबाईल अॅपलिकेशन विकसित केले आहे. त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये “मेरा ई-के.वा.सी.” अॅपलिकेशनद्वारे ई-के.वा.सी. पूर्ण करता येईल.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ज्या शिधापत्रिकेवर अन्न धान्य मिळत आहे, अशा सर्व लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानामध्ये जाऊन ई-के.वाय.सीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर “मेरा ई-के.वाय.सी.” मोबाईल प्रणालीद्वारे किंवा नजिकच्या अशिवा दुकानात जाऊन/शिधावाटप कार्यालय क्र.36 फ येथे जाऊन दि.31 मार्च 2025 पर्यंत ई.के.वाय. सी. पूर्ण करावे, असे आवाहन शिधावाटप कार्यालय क्र.36 फ, ठाणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.