CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : संजीवनी आदिवासी ग्रुपने त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या व पर्स शिवण्याचे प्रशिक्षण दिले. सर्वांच्या सहकार्याने ३०० पर्स तसेच १५० कापडी पिशव्या विकून त्यांच्यात विश्वास निर्माण केला .याचा पुढचा भाग म्हणून दिनांक 22.2.2025 या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या गुढीचे वस्त्र शिवण्याचे प्रशिक्षण दिले. लगेच 3 प्रकाराच्या गुढी वस्त्र रंजना आणि प्रमिला या दोन आदिवासी महिलांनी उमेश सरांसमोर शिवून दाखवल्या. आपणाला त्या तर नक्कीच आवडतीलच. मग करा खरेदी.
फोटो मध्ये जे कलर दाखवले आहेत त्या कलर मध्ये आम्ही तुम्हाला जो प्रकार आवडला आहे त्याची गुढी बनवून देऊ. तसेच ३ प्रकारच्या गुढ्यांचे फोटो व त्यांची किंमत सोबत पाठवत आहोत. आपणा सर्वांना मागणी नुसार पुरवठा केला जाईल. बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली येथे फ्री होम डिलिव्हरी दिली जाईल. त्यापुढील गिऱ्हाईक यांना courier चार्जेस द्यावे लागतील. आपली मागणी ५ मार्च पर्यंत कळविण्यात यावी. म्हणजे आम्ही त्या २० मार्च पासून डिलिव्हरी देऊ. ज्यांना कोणाला ५ गुढी हव्या असतील त्यांना ५ टक्के सवलत दिली जाईल तसेच ज्यांना १० गुढ्या हव्या असतील त्यांना १० टक्के सवलत दिली जाईल.
आपला एक मदतीचा हात आदिवासी महिलांना सक्षम करू शकतो .तसेच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्ही उमेश सर व बोकील यांना मोबाईल वर संपर्क करु शकता
संपर्क बोकील: 9623454809 / उमेश :9987757010 / डाॅ.अरुण पाटील