CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स चा ४ था चार्टर्ड डे उत्साहात संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : ( रोटरियन /पत्रकार राजेंद्र वखरे यांजकडून ) : संपूर्ण जगात पसरलेली रोटरी क्लब आणि त्याच्या अनेक देशांमध्ये झाडाला ज्याप्रमाणे फांद्या व पालवी फुटते अगदी त्याचप्रमाणे त्याच्या फांद्या व पालव्या विविध देशात व शहरांमध्ये विविध ब्रांचेस च्या नावाने यशस्वीपणे कार्य करीत आहे.महाराष्ट्र राज्यातही जवळ जवळ सर्वच शहरांमध्ये रोटरी क्लब विविध नावाने कार्यरत आहे. या रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध असे सामाजिक कार्य करण्यात येते आणि या माध्यमातून अनेक युवक, युवती पुरुष, महिला एकत्र येऊन चांगले कार्य करताना दिसतात.

त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरांमध्ये दि. १०/०२/२०२१ मध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री . डॉ.संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स ची स्थापना रोटे.डॉ. किरण तानपाठक यांनी टीमच्या मदतीने करण्यात आली. दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी या रोटरीचा चौथा चार्टर्ड डे अर्थात चौथा वाढदिवस जल्लोषात ,उत्साहात ,आनंदात डोंबिवलीतील स्टेशन जवळ असलेल्या शुभम बँक्वेट हॉल येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी या रोटरी क्लब मधील सर्व सदस्य व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हिरीरीने भाग घेतला .वर्षभरात रोटरी क्लबच्या वतीने विविध असे सामाजिक कार्य करण्यात येत असते. या माध्यमातून अनेक उद्योग व्यवसायाला चालना मिळत असते. अशा कार्यक्रमामधून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मता जपल्या जाते . एकमेकांशी चांगल्या प्रकारे ओळख होते ,आणि वर्षभरातील एक दिवस कुटुंबासमवेत घालवण्याची संधी रोटरी क्लब देत असते ,यावेळी विविध कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन ही करण्यात येते.

यावेळी करकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरियन सदस्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .यात सर्वच सदस्यांनी भाग घेतला व आनंदाने सर्व खेळ खेळले यात प्रश्नमंजुषा सह इतर खेळाचा समावेश करण्यात आला होता. यावेळी विविध रोटरियन यांना आपल्या सुप्त गुणांना वाव देण्याची संधी मिळाली . अनेकांनी यावेळी आपले विचारही खेळीमेळी च्या वातावरणात मांडले. अनेकांना विविध बक्षीसही देण्यात आली आणि चौथ्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष श्री. किशोर मुळे व सचिव मिस्टर.बॉबी पिंटो हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरियन श्री. उज्वल ठोंबरे यांनी केले.

यावेळी अध्यक्ष किशोर मुळे ,सचिव बॉबी पिंटो , रोटरियन राजेश भावे ,निलेश सोनवणे , प्रशांत दामले ,उज्वल ठोंबरे, आशिष कुलकर्णी, हृषीकेश टेंबे , सिद्धी पेंढारकर ,स्वानंद गोगटे ,अरविंद कोऱ्हाळकर , किरण तानपाठक , महेश जोशी, अमोद खरे , अजित काळे , राजेंद्र वखरे , सीमा वखरे , गोपाल सुर्यवंशी, सुयश अग्निहोत्री, गजानन धर्माधिकारी, गणेश तांबटकर , हरीश पुजारी, महेश झोपे , प्रशांत बापट, आदी उपस्थित होते.

rotry