CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
क्राईम बॉर्डर टीम - राजेंद्र वखरे यांजकडून
डोंबिवली : शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे यांनी या दोघं नेत्यांना वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून जनसेवा घडो याकरिता डोंबिवलीतील सागाव येथे असलेल्या पिंपळेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्र आणि यज्ञाचे आयोजन केले होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, विधानसभा क्षेत्र सचिव आणि डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, तसेच माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, मा.महापौर विनिता राणे, उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, मा. नगरसेवक प्रकाश माने , माजी नगरसेवक पंढरी पाटील, महिला शहर संघटक केतकी पवार, पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मोहन पाटील, एकनाथ पाटील, उपजिल्हाप्रमुख शितल लोके, तालुकाप्रमुख महेश पाटील ,विकास देसले,अनिल पाटील ,उपशहर प्रमुख दिनेश शिवलकर, संतोष तळाशी ,शेलकर बाला म्हात्रे आणि इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आमदार राजेश मोरे व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा दिल्या . त्यानंतर पिंपळेश्वर महादेव मंदिरात महामृत्युंजय मंत्र आणि यज्ञाचे त्यांनी आयोजन केले होते. शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी या दोन्ही नेत्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी महामृत्युंजय मंत्र आणि यज्ञाच्या प्रसंगी उपस्थित असलेले जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी महामृत्युंजय मंत्र यज्ञांचे फार मोठे महत्त्व असल्याचे सांगून मा. श्री एकनाथजी शिंदे व डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांना जनतेचे काम करण्यासाठी बळ मिळो असे साकडे पिंपळेश्वर महादेव मंदिरात घातले.
तसेच आमदार राजेशजी मोरे यांनी शिवसेनेच्या या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो यासाठी डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या वतीने सागाव येथील पिंपळेश्वर मंदिरात विशेष महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा नऊ तारखेला वाढदिवस आणि कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट, किंगमेकर ,सिंघम असलेले कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा असलेला चार तारखेला वाढदिवस या दोघांच्या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीत असलेल्या मंदिरात महामृत्युंजय व यज्ञांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले त्यांना चांगले आरोग्य लाभो व त्यांना प्रत्येक कामात यश निर्माण होवो यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
