CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली : डोंबिवलीतील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार , रोटरियन राजेंद्र वखरे यांच्या सामाजिक कार्याची व असंघटित महिलांना एकत्र करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना उद्योजिका म्हणून पुढे आणण्यासाठी विविध उपक्रम ते राबवित असल्याची दखल मुंबई आकाशवाणीने घेतली असून.
आकाशवाणीतील अस्मिता वाहिनीवर
कार्यक्रम : कामगार सभा अंतर्गत " महिला सक्षमीकरण आणि असंघटित कामगार महिलांसाठी कार्य " करणारे राजेंद्र वखरे यांची मुलाखत मुलाखतकार हर्षदा प्रभू यांनी घेतली असून तिचे प्रसारण गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६.३५ वाजता व दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.४० वाजता अस्मिता वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तरी श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेंद्र वखरे यांनी केले आहे.