CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल चे स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली पश्चिमेतील सुप्रसिद्ध सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल चे 23 वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच जल्लोषात संपन्न झाले.त्याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर शाळा ही डोंबिवलीतील नामांकित शाळा म्हणून ओळखल्या जाते या शाळेचा निकाल शंभर टक्के असतो. या स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव भोईर साहेब , क्राईम बॉर्डरचे प्रबंध संपादक तथा शाळेचे ट्रस्टी महेश भोईर सर तसेच क्राईम बॉर्डर चे सहसंपादक तथा ट्रस्टी संतोष भोईर सर व शाळेचे प्रिन्सिपल गणेश भोईर सर उपस्थित होते.

त्याचबरोबर अतिथी म्हणून युवा सेना कल्याण जिल्हा सचिव राहुल म्हात्रे साहेब तसेच गावदेवी सोसायटीचे चेअरमन गोवर्धन भोईर साहेब तसेच सेकंडरी सेक्शन च्या एच.एम वसंता सतीशकुमार मॅडम तसेच प्रायमरीच्या एच एम सायली पळसेकर मॅडम व प्री स्कूलच्या एच एम मेरी वारकर उपस्थित होत्या.

प्रमुख अतिथी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांचे विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालात गेट पासून स्टेजपर्यंत वाजत गाजत स्वागत केले.

प्रमुख अतिथी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण सर्वांनी शिस्तबद्ध जीवन जगले पाहिजे तसेच शिक्षकांचा सन्मान कसा राखावा याबाबत माहिती देत त्याचबरोबर जीवनाचे ध्येय निश्चित करूनच वाटचाल करावी असा सल्ला त्यांनी दिला ‌.

या स्नेहसंमेलनात तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी आपली नृत्य कला सादर केली .यावेळी अडीच हजाराच्या वर पालकांची उपस्थिती होती .पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे तोंड भरून कौतुक करत टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवला.

या समारंभात इयत्ता दहावीच्या पहिल्या आलेल्या तीन मुलांना प्रमुख अतिथी संजय पवार यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच संस्थापक अध्यक्ष नामदेव भोईर यांच्या हस्ते तीन शिक्षकांना बेस्ट टीचर अवार्डने सन्मानित करण्यात आले

या कार्यक्रमाला सौ.चंद्रा नामदेव भोईर, उद्योजक सिद्धांत म्हात्रे डॉक्टर रवीना डॉक्टर ऐश्वर्या डॉक्टर अक्षय डॉक्टर यश व पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी तिन्ही विभागाच्या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ट्रस्टींच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.