CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (विशेष प्रतिनिधी) : ठाकुर्ली येथील रहिवाशी सागर चौधरी यांच्या मातोश्री बेबीबाई भगवान चौधरी वय 70 यांचे वृद्धापकाळाने दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा सागर व सून तसेच विवाहित मुली सौ. अनिता जयराम चिंचोळकर व सौ. अश्विनी राजेश म्हात्रे,जावई नातवंडे असा भला मोठा परिवार आहे. डोंबिवली येथील रहिवाशी सुरेश काठे,दिनेश काठे तसेच क्राईम बॉर्डर चे राज्य प्रतिनिधी रमेश काठे यांच्या त्या मोठ्या भगिनी आहेत. त्यांच्यावर ठाकुर्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दहाव्या चा कार्यक्रम दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी गणेश घाट खंडोबा मंदिर रोड कुंभार खानपाडा डोंबिवली येथे होणार आहे तसेच तेराव्याचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे .
यावेळी समाजातील विविध स्तरावरील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या दुःखात क्राईम बॉर्डर परिवार सहभागी आहे.