CRIME BORDER | 20 December | 01:49 PM
अभूतपूर्व ! देव तारी त्याला कोण मारी...सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे अनमोल कार्य...
मुंबई (प्रतिनिधी) : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होताना पाहायला मिळते. प्रामुख्याने जीर्ण झाडे तोडून रस्त्यापासून बाजूला केली जातात. मात्र त्यावर पुन्हा वृक्षरोपण किंवा त्यांची पुनर्लागवड करून झाडे जिवंत करण्याचे कुठेही दिसून येत नाही. मात्र एक सकारात्मक उपक्रम पर्यावरणप्रेमींनी राबवला आणि एका आयुष्यभर माया लावणाऱ्या आणि छाया देणाऱ्या महाकाय वटवृक्षाला जीवनदान मिळाले.
नाशिक- नामपुर या राज्य मार्गाचे रुंदीकरण प्रक्रियेत तोडून रस्त्याच्या कडेला महाकाय वटवृक्ष पडला होता. तो पुनर्लागवड हेतूने अगदी अवघड घाट रस्त्याने समुद्रसपाटीपासून तब्बल ४५००फूट उंचावर नेत त्याला पुनर्जीवित करून अनोखा उपक्रम साकारत एक आदर्श घडविला आहे. विशेष म्हणजे कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर लावल्यानंतर तो अल्पकालावधीत पल्लवित देखील झाला.
नांदुरी- सप्तशृंगी गड या घाट रस्त्याच्या विकासकामात हा वटवृक्ष काढून टाकण्यात आला होता. त्याची पुन्हा लागवड करण्याची संकल्पना सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थांचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी निसर्गप्रेमी मित्र मंडळ नांदुरी या समूहाच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यात असलेले कळवण येथील पोलीस कॉन्स्टेबल योगेश गवळी यांना प्रत्यक्ष नेऊन कल्पना मांडली. हे वटवृक्ष सप्तशृंगगड या घाटरस्त्याच्या माध्यमावर आलेल्या रतनगड (माकड पॉइंट) याठिकाणी लावण्याचे ठरले. येथे अनेक माकडांचा वावर असतो.त्यांना निवारा तसेच तेथे सुशोभीकरण व येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सावलीसाठी एक जून रोजी त्याची लागवड केली वटपौर्णिमेला गडावर श्री भगवतीच्या दर्शनार्थी महिला भाविकांची तसेच स्थानिक महिलावर्गाला पूजेची संभाव्य सुविधा विचारात घेता निसर्गप्रेमींनी ही संकल्पना साकारली.
दरेगाव- नांदुरी या सीमेवर मागील पाच महिन्यांपासून कापून पडलेल्या ८० ते ९० वर्ष जुने महाकाय वटवृक्ष खोड , दोन पोकलँड, एक क्रेन ,दोन जेसीबी , एक कंटेनर च्या सहाय्याने रतनगड (माकड पॉइंट) येथे आणण्यात आला अन नियोजनानुसार त्याचे पुनर्रोपण करण्यात आले पण आश्चर्य म्हणजे पुढील ४८ तासात त्याला पालवी फुटली. सर्वांच्या चेहर्यावर आनंद फुलला, निसर्गप्रेमींनी केलेल्या इतरांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने अपेक्षित खर्च हा लाखाच्या घरात असताना समविचारी माणसे जोडून अल्प खर्चात योग्य व सर्वतोपरी सुरक्षित उपाय योजना राबवून हा उपक्रम पूर्ण झाला. विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणाचा र्हास केला जात असताना ,असे उपक्रम नवी उमेद व प्रेरणा देऊन जातात.
यांची लाभली मोलाची मदत.
उपक्रमासाठी एच.पी.एन.इन्फ्रा.लि. मार्फत , दौलत देवरे यांनी क्रेन सुविधा, औतुर यांच्याकडून ट्रेलर सुविधा, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट मार्फत पाणी टँकर आणि पिकप वाहन व आवश्यक मनुष्यबळ व तांत्रिक मदत संदीप बेनके व विवेक विवेक बेनके तर ज्ञानेश्वर सदगीर यांकडून जेसीबी उपलब्ध झाले. वैभव पाटील, गिरीश गवळी, शांताराम गवळी यांमार्फत शेणखत उपलब्ध करून दिले तर विश्वस्त मंडळ, तहसीलदार व स्थानिक ग्रामस्थ यांचेही सहकार्य लाभले.
या वडाच्या झाडाला आहे ऐतिहासिक संदर्भ १९ ५५ झाली संत गाडगेबाबा यांचे चैत्र यात्रे दरम्यान या वटवृक्षाखाली कीर्तन करून जणमाणसांचे प्रबोधन केल्याच्या आठवणीतील काही संदर्भ व वयोवृद्ध स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
संकलन : वैभव सूर्यवंशी ,(पत्रकार - क्राईम बॉर्डर)
मुख्य संपादक : राजेंद्र वखरे
बातम्या लेख व जाहिरातीसाठी संपर्क - साधा :मोबा. ९६१९६३००३५ / ९९८७४९६१३६