CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
बोरिवली :-(संतोष कोलंबकर ) महिला प्रवासी तन्वी राकेश लाड या कांदिवली वरून बोरिवली स्टेशन येथे रिक्षाने जात असताना बॅग रिक्षात विसरून गेल्या. सदर बॅग मध्ये काही रक्कम तसेच अत्यंत महत्वाची कागदपत्रे ATM कार्ड, पॅन कार्ड, आधारकार्ड होते.
बोरिवली स्टेशन परिसरात वाहतूक नियमन करत असताना रिक्षा चालकाची चौकशी केली असता सदर रिक्षा चालक बॅग घेऊन जात होता त्याकडून बॅग ताब्यात घेऊन महिलेचा नंबर काढून त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून बॅग ताब्यात दिली. त्याबद्दल त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल राहुल संजय जाधव व बोरिवली ट्रॅफिक पोलीस यांचे कौतुक केले.